विसापूर
सारोळा सोमवंशी ता.श्रीगोंदा येथील संदेश अनिल आढाव (वय १६) याचे रविवार दि.३ रोजी सायंकाळी सातच्या सुमारास विजेच्या धक्क्याने निधन झाले.संदेश विसापूर येथील सरस्वती विद्यालयात इयत्ता अकरावी शास्त्र शाखेत शिक्षण घेत होता.
सारोळा सोमवंशी येथे नवलेवस्ती जवळ गेल्या पंधरा दिवसांपासून एक पोल व तारा जमीनीवर आडव्या झालेल्या आहे.तरीही त्या लाईनवर विद्युत प्रवाह चालू असल्याचे नागरीकांनी सांगितले.महावितरणचे कर्मचा-यांना वारंवार सांगूनही दुरुस्ती न करताच प्रवाह चालू ठेवण्यात आला होता.रविवारी सायंकाळी संदेश जनावरांना चारा घेऊन येत असताना चिखलात पाय घसरुन विजेच्या तारेवर पडला.त्या तारेला विद्युत प्रवाह चालू असल्याने विजेच्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाला.त्याचे बरोबर त्याची बहीण व आई होती.त्याच्या बहीणीने त्याला दुर करण्याचा प्रयत्न केला.तिलाही विजेचा किरकोळ धक्का बसला.त्यांच्या आईने जवळ असलेल्या कपड्याच्या सहाय्याने त्यांना बाजूला केले.त्यामुळे आई व मुलगी वाचले मात्र संदेश त्या धक्क्यातुन वाचु शकला नाही.
दहा बारा दिवसापुर्वी सारोळा सोमवंशी येथे नवलेवस्ती जवळ पावसामुळे विजेचा पोल व तारा जमीनीवर पडल्या आहेत.ज्या ठिकाणी तारा पडल्या त्या ठिकाणी पावसामुळे मजुरांना जाणे शक्य नव्हते.त्यामुळे ते दुरुस्तीचे काम करता आले नाही.मात्र त्या ठिकाणचा विद्युत प्रवाह तत्काळ खंडित करण्यात आला होता.मात्र रविवारी अचानक कोणत्यातरी अज्ञात व्यक्तीने विज प्रवाह जोडला असण्याची शक्यता आहे.त्यामुळे ही घटना घडली आहे.या घटनेची माहिती वरिष्ठांना कळविली आहे.
-- दिपक सिंग, कनिष्ठ अभियंता,


Post a Comment