नेवासा, प्रतिनिधी
भागवताचार्य गोवत्स राधाकृष्ण महाराज हे रविवारी दि.१७ नोव्हेंबर रोजी श्री देवगड दर्शनासाठी येत असून भविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच अजय साबळे यांनी केले आहे.
नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड(मुरमे)गावामध्ये ग्रामस्थांच्या वतीने गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या अखंड हरिनाम सप्ताह तपपूर्ती सोहळा सुरू असून या सोहळ्याला गोवत्स भागवताचार्य महंत राधाकृष्ण महाराज हे भेट देणार असून त्यानिमित्ताने भगवान दत्तात्रय व श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या समाधीचे दर्शन घेणार आहे तसेच अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने भेट देऊन शुभाशीर्वाद देणार आहे
पंचक्रोशीतील भाविकांनी रात्री रविवारी १० वाजता होणाऱ्या कार्यक्रमाप्रसंगी संत दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच अजय साबळे व सोहळा कमिटीच्या सदस्य व ग्रामस्थांनी केले आहे.

Post a Comment