शेतात हिरवेगार गवत वाढल्याने साफ करण्याचे शेतकऱ्यांसमोर आव्हान

पाथर्डी- प्रतिनिधी | अमोल म्हस्के
यावर्षी अनियमित हवामानामुळे सातत्याने पाऊस झाला.पाऊसाने गेल्या आठवड्याभरापासून चांगली उघडीप दिली आहे.पाऊसामुळे शेतात गवत मोठ्या प्रमाणात  वाढलेले आहे. शेत हिरवेकंच दिसत आहे. पीक काढून रिकामे झालेल्या शेतात सर्वत्र गवत वाढले आहे.शेतीचा मशागती करण्याचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.गवताचे प्रमाण शेतामध्ये खूप आहे. संपूर्ण शेतात गवतच आले आहे. हे गवत जनावरांना खाण्यायोग्य नसून पाऊसाच्या पाण्याने सडून गेले आहे.त्यामुळे जनावरे हे शेतात सोडले तरी खाणार नाहीत. गवतापासून काही जनावरांना अ‍ॅलर्जीसुद्धा होते. आता शेतकऱ्यांपुढे शेत मशागतीचे आव्हान आहे.काही शेतकरी तणनाशकाचा प्रयोग करत होते.

मात्र तणनाशक औषधांचाही फारसा प्रभाव गवतावर होत नाही. काही दिवस वाढ खुंटल्यानंतर पुन्हा जोमाने गवताचे झाड वाढू लागते. गेल्या काही वर्षांमध्ये शेतकऱ्यांनी पिकातील आंतर मशागत बंद केल्यानेही गवताचे प्रमाणात वाढ झाली आहे.असे काही शेतकऱ्यांचे मत आहे.शेतात पाण्याने सडलेली गवते जनावरे खात नाहीत. 

दिपावली दरम्यान झालेल्या पाऊसामुळे शेतात गवत वाढले आहे.आगामी काळात शेतकरी गहु,हरभरा पेरणी करणार आहे.शेतातील तणामुळे शेतकरी हतबल झाला आहे.काही शेतकरी  तणनाशक फवारत आहेत.फवारणी नंतर तणाचा नाश होण्यासाठी काही दिवस थांबावे लागते.माञ तेही तण गोळा करावे लागत असल्याने दुप्पट खर्च शेतकऱ्यांचा वाढत आहे.सद्धा शेतीचे काम जास्त काम करणारे मजूर कमी दिसत आहेत.पैसे देऊनही मजूराअभावी     घरचे शेतात राबवत असतात. 

यावर्षी मात्र कोरडवाहू असलेल्या शेतानांही विळखा बसला आहे. सततच्या पावसामुळे त्याची वाढ जोमाने होत आहे.कासार पिपंळगाव,साकेगाव,पागोरी पिपंळगाव,निवंडुगे परीसरातील शेतकरी टॕक्टर,बैल यांच्या सहाय्याने घेतल्या जाणाऱ्या पिकासाठी शेत करताना दिसत आहेत.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget