नेवासा, प्रतिनिधी
पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुख्मिनी मंदिर समितीच्या वतीने सुमारे ८० कोटी रुपये खर्चाच्या उभारण्यात आलेल्या भक्तनिवास हे वारकरी भक्तांसाठी खुले करण्यात आले असून या भक्तनिवास मधील सुखसुविधाचा वारकऱ्यांसह भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन पंढरपूर श्री विठ्ठल रुख्मिनी मंदिर समितीचे विश्वस्त व नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथील महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी केले आहे.
या भक्त निवासामध्ये तुळस, झेंडू, लाल फुल, २७ नक्षत्रांची २७ वृक्षे आदी धार्मिक तसेच आरोग्यदायी वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे नक्षत्रांची लागवड करताना जे नक्षत्र सुरु आहे. त्या नक्षत्रावर वृक्ष लावले आहेत. या भक्त निवासमध्ये ८ लोकांना एकत्र राहता येईल असे ७८ हॉल तयार करण्यात आले आहेत. तसेच पाच लोकांना एकत्र राहता येईल असे ६३ हॉल तयार करण्यात आले आहेत. २ बेड असलेल्या ८१ रूम, दोन बेडचे व्हीआयपी वातानुकूलित ५१ रूम्स, व्हीआयपी ८ सूट, व्हीव्हीआयपी ६ सूट अशी राहण्याची सोय करण्यात आली आहे.
कार्तिकी एकादशी निमित्ताने गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी पंढरपूर येथे जाऊन श्री विठ्ठल रुक्मिणीचे
दर्शन घेतले मंदिर समितीच्या वतीने नुकतेच भव्य असे सर्व सुविधांसह भक्तनिवास उभारण्यात आले असून
या भक्तनिवासामुळे वारकऱ्यांची चांगली सोय होणार असून या सुविधांचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन गुरुवर्य भास्करगिरी महाराजांनी केले आहे.

Post a Comment