नेवासा-प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील कुकाणा येथे गेल्या अनेक दिवसापासुन अर्धनग्न अवस्थेत फिरत असलेल्या मनोरुग्ण महिलेला नाभिक समाजसेवक संजय वाघ यांच्या पुढाकाराने अहमदनगर येथील माऊली सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून बेघर बेवारस मनोरुग्णास माय - भगीनीचे हक्काचे घर मिळाले आहे.
या समाजसेवेच्या भावनेतुन त्यांनी कुकाणा येथील बसथांबा परिसर व गावात अनेक दिवसापासून एक मनोरुग्ण महिला अर्धनग्न अवस्थेत फिरत आहे. तिची ती अवस्था पाहून संजय वाघ यांनी अहमदनगर येथील माऊली आश्रमचे डाॕ. राजेंद्र धामणे यांच्याशी संपर्क केला व संबधित महिलेची माहिती दिली असता डॉ.धामणे यांनी त्या महिलेला येथे घेऊन या असे सांगितलेे. त्यानंतर वाघ यांनी मोबाईलवरील मित्र परिवाराच्या ग्रुुप वर चर्चा करून सदर मनोरुग्ण माहिलेबाबत सदर माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन करताच अनेकांचे मदतीचे हात सरसावले व आर्थिक सहकार्य करुन या महिलेस माऊली सेवा प्रतिष्ठाण आश्रम येथे डॉ. राजेंद्र धामणे यांच्या स्वाधीन केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शुभम कदम, संदिप बेळगे जयवंतराव मोटे,लखन गरड,कचरु लिंगायत हे उपस्थित होते. या सामाजिक कार्यासाठी सिध्दार्थ कावरे, राम वाबळे, ग्रामसेवक संजय वाघ, किरण राऊत, महेश सावंत, तुषार कल्हपुरे, महावीर पटवा, तोफिक इनामदार, अरुण फोलाणे, डॉ. ज्ञानदेव गरड रामेश्वर तुपे यांनी विशेष अर्थिक सहकार्य केले. या समाजकार्याबदल संजय वाघ व त्यांच्या मित्र परिवाराचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे
.महाराष्ट्र नाभिक युवा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष पत्रकार सुनिल पंडित यांच्या प्रेरणेने २०१८ पासुन " एक दिवस समाजसेवेसाठी " हा मंत्र घेऊन मनोरुग्ण, बेवारस, अनाथ, याा लोकांची दाढी-कटींग करुन त्यांना साबनाने आंघोळ घालुन स्वखर्चाने नविन कपडे देणे हे कार्य मी सुरु केलेले आहे. या कामात पैसा नाही पण समाधान मिळते म्हणुन ही सेवा कायम सुरूच ठेवणार आहे असे समाजसेवक संजय वाघ यांनी सांगितले.

Post a Comment