माजी आ.मुरकुटे यांच्याकडुन पिकांच्या नुसकानीची पाहणी

करजगांव 
नेवासा तालुक्यातील अतिवृष्टी मुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी मुळाकाठ परिसरातील  करजगांव ,अमळनेर व पानेगाव येथील शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या बांधावर जात पिकांची पाहणी केली. पंचनामे करताना शेतक-यावर अन्याय होणार नाही तसेच  शेतकरी वंचित राहणार नाही याची  काळजी घेण्याचे आव्हाहन माजी आ.बाळासाहेब मुरकुटे यांनी केले. 
यावेळी कपाशी,बाजरी,सोयाबीन,कांदा तसेच चारा पिकांचे नुसकानाची पाहणी केली. सध्या नुकसान ग्रस्त पिकांचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. परतीच्या पावसाचा फटका मुळाकाठ परिसरासह तालुक्याला बसलेला आहे. सुरुवातीच्या दमदार पावसाने  यावर्षी चांगला हंगाम होईल अशी अपेक्षा शेतक-यांना होती. मात्र प्रत्यक्षात परतीच्या पावसानेही अपेक्षा देखील फोल ठरली. कर्ज काढून शेतकरी आपला उदरनिर्वाह करत शेती करतात मात्र निसर्गाच्या अवकृपेमुळे परतीच्या पावसाने शेतकऱ्यावर आस्मानी संकट उभे केले. 
यावेळी उपसरपंच अशोक टेमक,तलाठी देठे भाऊसाहेब,लिपीक प्रशांत पुराणे,सुनिल टेमक,संदिप पुंड,दिपक कंक,अमोल टेमक,परसराम माकोणे, बाबासाहेब टेमक मेजर, विठ्ठल फुलसौदर,मच्छीद्र मदने,जालिंदर गागरे, लक्ष्मण माकोणे आदी सह शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget