पाथर्डी - प्रतिनिधी । अमोल म्हस्के
पाथर्डी तालुक्यातील दुष्काळी भागात सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे काम नितीन एडके परीसरात इमारत बांधकाम व्यवसायच्या माध्यमातून करत आहे.वाढत्या बेरोजगारीतही तब्बल ८० तरुणांना पाथर्डी व पुणे या ठिकाणी रोजगार मिळवून दिला आहे.उत्कृष्ट दर्जाची घरे बांधून देण्याचे काम करत आहेत.बांधकाम व्यवसाय करत असाताना वृक्षारोपन,शालेय विद्यार्थ्यांना वहया पुस्तके वाटप,आश्रम शाळेत राहणाऱ्या मुलांना फळे मिठाई वाटप,गो शाळेला चारा वाटप यासारखे विविध सामाजिक उपक्रम पाथर्डी तालुक्यातील अनेक गावात राबवत आहेत.अनेक बेरोजगार युवकांना स्वतःचे व्यवसाय उभारणीसाठी भांडवल उपलब्ध करुन दिले आहे.अहमदनगर येथील शासकीय तंत्र निकेतन मधून सिव्हिल इंजिनियर पदविका मिळवली आहे.त्यांनी ए.एन.गृप ऑफ इंडस्टीजची स्थापना करुन उद्योग क्षेत्रात घवघवीत यश संपादन केले आहे.
यांच्या सामाजिक उपक्रमाची दखल घेत दुबई येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय बिझनेस कॉन्फरन्स मध्ये घेवून २०१९ वर्षाचा युवा उद्योग पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.कमी वयात रोजगार उपलब्ध करुन देण्याचे काम एडके करत असल्याने त्याचे परीसरातून कौतुक करण्यात येत आहे.

Post a Comment