दाणेवाडी शिवारात वाळू उपसा करणा-या एकवीस बोटी जिलेटिनच्या सहाय्याने उध्वस्त.

बेलवंडी पोलीसांची धडक कारवाई. 

विसापूर
श्रीगोंदा व शिरुर तालुक्याचे सरहद्दीवरील घोड नदी पात्रात वाळू उपसा करणाऱ्या यांत्रिक बोटींवर मंगळवारी बेलवंडी पोलीस व शिरुर तहसीलदार यांच्या संयुक्त  पथकाने धडक कारवाई केली. 
   घोड नदी पात्रा लगतच्या दानेवाडी, गोपाळवाडी व परिसरात नदीमध्ये वाळू उपसा करणाऱ्या 21 यांत्रिक बोटी या पथकाने जिलेटीनच्या सहाय्याने स्फोट घडवून नष्ट केल्या आहेत.या बोटींची अंदाजे किंमत दिड काटी असल्याचे पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी सांगितले. 
            ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक इशू सिंधू,अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्या आदेशाने व दर्जाचे उपविभागीय पोलीस अधीकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरविंद माने, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश बोराडे, पोलीस नाईक नंदकुमार पठारे,पोलीस कर्मचारी दादासाहेब क्षीरसागर,संपत गुंड,विकास कारखीले, चालक म्हस्के, त्याचप्रमाणे शिरुरच्या तहसीलदार लैला शेख  व त्यांचे पथक यांनी केली आहे.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget