क्षेत्र देवगड येथे श्री दत्त जयंतीच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न !

दत्तजयंती सोहळा वैभवशाली होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा - गुरुवर्य भास्करगिरी महाराज

नेवासा,प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे शुक्रवार दि.८ नोव्हेंबर रोजी श्री दत्त जयंतीच्या पार्श्वभूमीवर गुरुवर्य हरिभक्त परायण भास्करगिरी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.दत्तजयंती सोहळा यशस्वीते साठी तसेच हा सोहळा वैभवशाली होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा असे आवाहन गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी यावेळी बोलताना केले.
यावेळी झालेल्या नियोजन बैठकीच्या अध्यक्षस्थानी  गुरुवर्य भास्करगिरी महाराज हे होते तर निवासी नायब तहसीलदार संजय परदेशी,पोलिस निरीक्षक रणजित डेरे, मंडलाधिकारी सुनील लवांडे,कामगार तलाठी आण्णासाहेब दिघे,विजय गांधी,नेवासा डेपोचे आगार व्यवस्थापक, अहिरराव,सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता रमेश खामकर,पत्रकार सुधीर चव्हाण, वीज वितरण कंपनीचे शाखा अभियंता एस. आर. वाघ, खडका टोलनाकाचे व्यवस्थापक विलास देसले, होमगार्ड समादेशक पत्रकार बाळासाहेब देवखिळे, मोहन गायकवाड, सरपंच अजय साबळे, माजी उपसरपंच भीमाशंकर वरखडे यांनी महत्वपूर्ण सूचना केल्या  यावेळी बोलताना गुरुवर्य भास्करगिरी महाराज म्हणाले की देवगडचा दत्तजयंती सोहळा यशस्वीपणे पार पाडता यावा म्हणून एक महिना अगोदर ही नियोजन बैठक घेतली जाते त्यामुळे सर्व विभागातील अधिकाऱ्यांना नियोजनबद्ध कामे करता येतात,देवगड हे धार्मिक व समाज सेवेचे केंद्र आहे,ते सर्वांकरीता दत्तजयंती सोहळा आनंदमय वातावरण पार पाडण्यासाठी सर्वांनी नेमून दिलेली कामे सहकार्याद्वारे करायची आहे,रस्ते हे सर्वांच्या सुखाकरीता असल्याने देवगडकडे रस्त्यावर कोणीही अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये रस्ता भाविकांना चालण्यासाठी खुला करून सहकार्य करावे असे आवाहन केले.
यावेळी संत सेवक बजरंग विधाते यांनी देवगड दत्तजयंती निमित्त होणारे विविध कार्यक्रम,पाण्याच्या पाण्याची व्यवस्था,वीजेची व्यवस्था,सुरक्षा व्यवस्था,जल वाहतूक,भोजन व्यवस्था,घाट परिसरातील व्यवस्था,
दर्शन बारी नियोजन,स्वच्छतागृह कक्ष,बसस्थानक शेडची व्यवस्था,वाहनतळ व्यवस्था,आरोग्य सुविधा,रस्ता दुरुस्ती जलमार्ग व्यवस्था याबाबत माहिती दिली.
या बैठकीच्या प्रसंगी संतसेवक बाळू महाराज कानडे, गोविंदराव शेळके,चांगदेव आण्णा साबळे,सीताराम जाधव,मुळा कारखान्याचे संचालक बाळासाहेब पाटील, महेंद्र फलटणे,लक्ष्मीनारायण जोंधळे,ज्ञानदेव लोखंडे, संदीप साबळे,सुभाष जाधव,प्रशांत निपुंगे,रामकृष्ण मुरदारे,रमेश ओस्तवाल,दामोदर साबळे यांच्यासह भाविक सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


दत्त मंदिर परिसरात होत असलेली मच्छीमारी बंद करण्याबाबत भाविकांची मागणी
यावेळी झालेल्या बैठकीत देवगड मंदिराजवळ असलेल्या प्रवरा नदीच्या पट्यात मुरमे,गोधेगाव,मडकी या भागातून मोठ्या प्रमाणात नदीत जाळे फेकून मच्छीमारी केली जाते विशेष म्हणजे हा पट्टा महान तपस्वी सदगुरू किसनगिरी बाबांच्या तपोभूमीचा असून त्यांनी तपश्चर्यासह ध्यानधारणा केली आहे त्यावेळेस इतरांनी पकडलेले सर्व मासे ते पाण्यात सोडून देत भगवंताच्या चारणाजवळ शरण आलेल्याना मरण नसल्याने या भागातील मासेमारी टाळावी तसेच जाणूनबुजून कोणी मासेमारी करत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करताच पोलीस निरीक्षक रणजित डेरे व निवासी नायब तहसीलदार संजय परदेशी यांनी प्रशासकीय पातळीवर कडक कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही  भाविकांसमोर बोलतांना दिली.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget