चांदेकसारे (वार्ताहर)
अतिवृष्टीच्या पावसाने गेल्या पंधरा दिवसापूर्वी केलेले नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण केले त्याचा अहवालही जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला मात्र शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळाली नाही कोपरगाव तालुक्यातील शेतकरी त्या मदतीच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण या विषयावर गेल्या 17 दिवसापासून मोठे रणकंदन चालू आहे भाजपा शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी पक्ष यांनी कोणीच आपले बहुमत सिद्ध न केल्यामुळे महाराष्ट्राची सध्या राष्ट्रपती राजवटीच्या वाटचाल सुरू झाली आहे. लवकरच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल व शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळेल यादृष्टीने शेतकऱ्यांचे लक्ष महाराष्ट्र मुख्यमंत्री निवडणुकीकडे लागले होते. मात्र कोणाचे बहुमत सिद्ध न झाल्यामुळे शेतकऱ्यांचाही भ्रमनिरास झाला. राष्ट्रपती राजवट तर राष्ट्रपती राजवट मात्र आम्ही शेतकऱ्यांनी कोणाचे काय नुस्कान केले म्हणून आम्हाला आमच्या झालेल्या पिकाची नुसकान भरपाई ही देण्यास दिरंगाई का होत आहे असा प्रश्न जेऊर कुंभारी येथील शेतकरी रमेश वक्ते व उत्तम चव्हाण यांनी व्यक्त केला.
कोपरगाव तालुक्यातील महसूल विभाग ,कृषी विभाग व ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन युद्धपातळीवर कोणी शेतकरी नुकसानीचा पंचनामा पासून वंचित राहणार नाही या दृष्टीने सर्व शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे केले .केलेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनाम्याचे सर्व रिपोर्ट त्यांनी तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयातही पाठवली. त्यामुळे शेतकरी ह्या विभागावर खूप झाले होते. लवकरच आपल्याला झालेल्या पिकाची नुसकान भरपाई मिळेल या आशेवर शेतकरी अवलंबून आहे.


Post a Comment