पाथर्डी- प्रतिनिधी | अमोल म्हस्के
पाथर्डी तालुक्यातील कासार पिपंळगाव येथील तरुण ग्रामस्थ एक लग्न एक वृक्ष राबवत असलेल्या उपक्रमात पोलिस निरीक्षक मा.पवार साहेब,माजी.पी.एस.आय.
मुक्ताजी भगत,
ग्रामसेवक प्रमोद म्हस्के यांच्या उपस्थितीत नव वधूवर सतिष व अर्चना जगताप व सुधीर व श्वेता गायकवाड, या दोन वधू वर दाम्पत्य यांनी अनावश्यक खर्च टाळून गावातील मंदीर परीसरात संरक्षित जाळ्यासहीत वृक्षारोपण नववधूच्या हस्ते करण्यात आले.
सुमारे एक वर्षापासून गावातील तरुण व ग्रामस्थ तसेच व्यसनमुक्त युवक संघाचे सदस्य सुखदेव मुरलीधर म्हस्के तसेच युवक मिञ
बंडातात्या कराडकर यांच्या सहकार्याने उपक्रम राबवत आहेत.या उपक्रमात नववधू दाम्पत्य यांच्या हस्ते गावात वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतीचे वृक्षारोपण केले जात आहे.या उपक्रमाला परीसरातून चांगला प्रतिसाद मिळत असून कौतुक केले जात आहे.यामुळे गावाचा परीसर हिरवागार व निसर्गरम्य होणार आहे.यावेळी अनावश्यक खर्च टाळून वृक्षारोपण केलेल्या नव वधू वर दाम्पत्यांचे अभिनंदन करुन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या वेळी आर.वाय.म्हस्के, विक्रम राजळे,आबासाहेब म्हस्के,गणेश भगत,संदिप राजळे, नववधू दाम्पत्यांचा परीवार तसेच गावातील तरुण ग्रामस्थ,ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment