नेवासा,प्रतिनिधी
शिवसेना प्रमुख हिंदू हदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांना शिवसहकार सेनेच्या वतीने नेवासा येथे अभिवादन करण्यात आले.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मराठी माणसाला स्फूर्ती देणारे असून त्यांचे ज्वलंत विचार अंगीकारुन राष्ट्रभक्तीची ज्योत मनामनात पेटवा असे आवाहन शिवसेना प्रणित शिवशिवसहकार सेनेचे राज्य उपप्रमुख बालेंद्र पोतदार यांनी यावेळी बोलताना केले.
यावेळी बोलताना बालेंद्र पोतदार म्हणाले की प्रत्येक भारतीयांच्या मनामनात राष्ट्रभक्तीची ज्योत पेटविण्यासाठी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी ज्वलंत व प्रखर राष्ट्रभक्ती कशी असावी याचे विचार दिले त्यांनी दिलेल्या विचारांमुळे प्रत्येकाच्या मनात राष्ट्रभक्तीची ज्योत पेटली त्यांनी दिलेल्या विचारांचे टॉनिक हे प्रत्येक शिवसैनिक व मराठी माणसाला प्रेरणा व स्फूर्ती देत गेले त्यांच्या विचारातून प्रत्येकाने स्फूर्ती घेऊन त्यांच्यासारखी प्रखर राष्ट्रभक्ती जागृत करावी असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.
शिवसेना प्रमुख हिंदूहदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस शिवसेना प्रणित शिवसहकार सेनेचे राज्य उपप्रमुख बालेंद्र पोतदार यांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले यावेळी भाजपचे नेते अशोक ताके, भारतीय पत्रकार संघाचे जिल्हा संघटक सुधीर चव्हाण, मराठा बटालियन युवा ग्रुपचे अभयसिंह मोहिते पाटील, होमगार्डचे शकील शेख,सामाजिक कार्यकर्ते अरुण जाधव यावेळी उपस्थित होते.

Post a Comment