शुभम एन.जठार - विसापूर
श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर जलाशय पावसाळा संपल्यावर प्रतिक्षेनंतर अखेर रविवारी सकाळी सात वाजता ओव्हरफ्लो झाला.
विसापूर जलाशयाचे सांडव्याची लांबी सुमारे अर्धा किलो मिटर असल्याने ओव्हरफ्लोच्या पाण्यामुळे आकर्षक लांब धबधबा तयार होत असल्याने पर्यटकांची रेलचेल वाढत आहे.दोन वर्षापुर्वी २०१८ मध्ये विसापूर ओव्हरफ्लो झाले होते.त्यावेळी श्रीगोंदा,दौंड,नगर,पारनेर व शिरुर तालुक्यातील पर्यटकांनी हजेरी लावली होती.विसापूर ओव्हरफ्लो झाल्याचे समजताच परिसरातील लोकांनी सायंकाळी सांडव्यावर गर्दी करण्यास सुरुवात केली.विसापुर कारागृह व विविध कार्यालयात नोकरी केलेले मात्र बाहेरगावी असलेले कुटुंब,माजी विद्यार्थी पर्यटनासाठी येत आसतात.आता पावसाळा थांबल्यामुळे हंगानदीला फारतर दहा पंधरा दिवस पाण्याचा फ्लो चालू रहाण्याची शक्यता असल्याने पर्यटकांना फार दिवस आनंद लुटता येणार नाही.कुकडी कालव्याचे पाणीही बंद झाले आहे.
विसापूर धरण हे पारनेर तालुक्यातून वहात येणाऱ्या हंगानदीवर बांधण्यात आले आहे. ब्रिटिश सरकारने बांधलेले हे अहमदनगर जिल्ह्यातील संपूर्ण मातीचा बंधारा टाकून तयार केलेले पहीले धरण आहे.१८९६ साली धरणाच्या कामाला प्रत्यक्ष सुरवात झाली.१८९६ ते १९०० या चार वर्षे दुष्काळी कामातील मजुरांकडुन काम करण्यात आले.१९०१ ते १९२७ या काळात इतर मजुरांचा वापर करून काम पूर्ण करण्यात आले.या कामावर १९१६ ते १९२३ या कालावधीत विसापूर कारागृहातील कैद्यांचा मजुर म्हणून वापर करण्यात आला.सर्व कालवा व चा-यांसह धरणाचे काम १९२९ मध्ये पूर्ण झाले.हे धरण पूर्ण करण्यासाठी ब्रिटिश सरकारला ३३ वर्षांचा कालावधी लागला.या धरणाचे काम चालू असताना या कालावधीत सी.एन.क्लीफटन,पी.जे.फीटझगीबॉन,आर.जे.केन्ट,के.एस.फ्रम्जी,ए.एच.व्हाईट या ब्रिटिश कार्यकारी अभियंता यांनी कामकाज पाहीले.पी.जी.फीटझगीबॉन,जे.जे.बी.बेन्झन,टी.एस.पाईप,एफ.जे.वॉनबॉक,सी.ओ.लॉसली व एच.जे.एम.कॉऊसेन्स या कार्यकारी अभियंता यांनी काम पाहिले.तर लक्ष्मण विठ्ठल,के.बी.ब्रम्हे,एच.ई.विलकीसन, डी.एन.क्षिरसागर, एम.एस.अॅटोनी या उपविभागीय अधिकारी यांनी काम पाहिले.बी.एन.जपे ओव्हरसीअर यांनी सर्वाधिक काळ १९०२ ते १९२७ या पंचवीस वर्षे कामकाज पाहिले.धरणाचे कामकाज पहाणारे अधिक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता हे सर्व वरिष्ठ अधिकारी ब्रिटिश होते. धरणाच्या मातीच्या बंधा-याची लांबी सव्वादोन किलो मिटर(७४४० फुट) तर उंची ८४ फुट आहे.कालव्याची लांबी २९ किलोमीटर असुन दहा हजार एकर क्षेत्र ओलीता खाली येणे अपेक्षित होते.धरण बांधण्यासाठी त्यावेळी २१ लाख रुपये,तर कालवा व इतर बांधकामासाठी १९ लाख असा एकुण ४० लाख खर्च झाला.धरण बांधताना त्याची साठवण क्षमता ११३८ दशलक्ष घनफूट होती.मात्र १९३४ मध्ये सांडव्याची उंची दोन फुट वाढवून धरणाची क्षमता १३२८ दशलक्ष घनफूट करण्यात आली.विसापूर धरण प्रथम १९२७ च्या पावसाळ्यात भरण्यात आले.२६ ऑगस्ट १९२९ रोजी मुंबई प्रांतात तत्कालीन गव्हर्नर सर फ्रेडरिक हग सायकस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
धरणाचे वैशिष्ट्य.
एवढ्या दिवसापुर्वी बांधलेल्या या मातीची भिंत असलेल्या धरणातून थेंबभर पाण्याचाही झिरपा होत नाही.धरणाचे भिंतीच्या खालच्या बाजूला बोअरवेल घेतला तरीही त्याला पाणी लागत नाही.इतक्या वैशिष्ट्य पुर्ण पद्धतीने हे धरण बांधण्यात आले असल्याचे जुनी जानते लोक सांगत आहेत.


Post a Comment