नेवासा,प्रतिनिधी
अयोध्येच्या निकालानंतर तेढ निर्माण होईलअसे वातावरण निर्माण करू नका,कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाही याची काळजी प्रत्येकांनी घ्यावी त्यासाठी सर्वांनी संयम बाळगावा असे आवाहन विश्व हिंदु परिषदेचे केंद्रीय मार्गदर्शक व नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड गुरुदेवदत्त पिठाचे प्रमुख गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी केले आहे.
आमच्या प्रतिनिधीशी बोलताना ते म्हणाले की संस्कृती व संस्काराने नटलेला जगाच्या पाठीवर भारत हा एकमेव देश असून जगा आणि जगू द्या,हे तत्व अंगिकारणारा देश आहे,माणूस हीच जात व माणूसकी हा धर्म अशी शिकवण येथील संतांनी दिली आहे.
गेल्या ४०० वर्षापासून राममंदिराचा हा प्रश्न प्रलंबित आहे त्याचा निकाल थोड्याच दिवसावर येऊन ठेपला आहे प्रभू रामचंद्र,भगवान श्रीकृष्ण,शंकर भगवान ही देशाची अस्मिता आहे,या देवतांनाच कुणी अल्ला तर कुणी गॉड म्हणते या देवतांचा आशीर्वाद सर्वांनाच आहे, आयोध्येचा निकाल लागल्यानंतर सर्वंधर्मीय लोकांनी कोर्टाच्या या निकालाचा स्वीकार करावा,तेढ निर्माण होणार नाही, कुणाच्याही भावना दुखावल्या जाईल ही भावना अंतकरणात निर्माण होऊ देऊ नका,आपल्या गैरकृत्याने देश बदनाम होईल असे वातावरण निर्माण करू नका असे आवाहन गुरुवर्य भास्करगिरी महाराजांनी यावेळी बोलताना केले.
हिंदू मुस्लिम बांधवांना विनम्र प्रार्थना करतांना ते म्हणाले की या निकालाने कुणाचा जय कुणाचा पराजय असा प्रश्न नाही तर हा अस्मितेचा प्रश्न असल्याने सर्वांनी न्यायदेवतेचा
निकाल एकदिलाने स्वीकारावा,कुणीही यासाठी मिरवणुका काढू नका असे आवाहन केले तर किर्तनकारांनी
देखील कीर्तनाच्या माध्यमातून इतर समाज दुखावला अशी वाच्यता करू नये,

Post a Comment