शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्याचा आदर्श सुरूच राहील - आमदार आशुतोष काळे


चांदेकसारे(वार्ताहर ) 
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचा ६५ वा बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभ आज माजी आमदार अशोकराव  काळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि श्री. अनिलशिंदे व कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत, कारखान्याचे उपाध्यक्ष पद्माकांत कुदळे व त्यांच्या सुविद्य पत्नी  शिलाताईपद्माकांत कुदळे यांच्या शुभहस्ते आज पार पडला.

यावेळी बोलताना आमदार आशुतोषदादा काळे म्हणाले की, मागील दोन तीन वर्षापासून दुष्काळ व यावर्षी ओला दुष्काळ अशा दुहेरी संकटात सापडलेला २०१९-२० चा गळीत हंगाम अडचणीचा ठरणार आहे. मात्र येणाऱ्या अडचणीवर मात करून गळीत हंगाम यशस्वी करू व माजी खासदार कर्मवीर शंकररावकाळे यांनी दाखविलेला शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्याचा आदर्श यापुढेही सुरूच राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी छबुराव आव्हाड, बाळासाहेब कदम, सुधाकर आवारे, पंचायत समितीच्या सभापती  अनुसयाहोन, कारखान्याचे सर्व संचालक मंडळ, संलग्न संस्थांचे सर्व चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक, पदाधिकारी, माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, पंचायत समितीचे उपसभापती, सर्व सदस्य, सर्व जिल्हा परिषद सदस्य, सलग्न संस्थांचे चेअरमन, व्हा. चेअरमन, पदाधिकारी, कोपरगाव नगर परिषदेचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक, राष्ट्रीय कॉंग्रेसचे पदाधिकारी, सभासद, शेतकरी, कामगार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget