भगवान विश्वकर्मा मंदिरात भंडारा व महाआरती कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

नेवासा, प्रतिनिधी
नेवासा येथील सदाशिवनगर प्रभागात असलेल्या भगवान विश्वकर्मा मंदिरात महिन्याच्या पहिल्या बुधवारी दि.६ नोव्हेंबर रोजी आयोजित भंडारा कार्यक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या निमित्त महाआरती करण्यात आली.
    यावेळी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी पॅथॉलॉजी लॅबचे तज्ञ जालिंदर गोरे व सौ.गायत्रीताई गोरे यांच्या हस्ते महाआरती
करण्यात आली.याप्रसंगी झालेल्या धार्मिक कार्यक्रम व महाआरतीचे पौरोहित्य कुलकर्णी गुरू यांनी केले.यावेळी अन्नदान करणाऱ्या गोरे दाम्पत्याचा भगवान विश्वकर्माची प्रतिमा देऊन गौरव करण्यात आला
       यावेळी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी मंदिर व्यवस्थापक इंजिनियर सुनीलराव वाघ,वास्तूशिल्प कार राजेंद्र परदेशी, मंदिर पुजारी हभप भाऊसाहेब मोरे महाराज, बाबासाहेब मोरे,बबनराव राजे,तुकाराम गोसावी,मच्छिंद्र गव्हाणे, किशोर गावडे, ज्ञानेश्वर वाघ,श्रीमती शेटे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    भगवान विश्वकर्मा मंदिर प्रांगणात सद्या मंदिर निर्मिती नंतर सभामंडप खिडक्या दरवाजे बसविणे मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे,जेष्ठांसाठी बाक बसविणे आदी काम सुरू झाले असून या सुभोभिकरण कार्याला
सर्वांनी साहित्य रूपाने मदत करावी असे आवाहन यावेळी इंजिनियर नगरसेवक सुनीलराव वाघ यांनी यावेळी बोलताना केले.यावेळी उपस्थित भाविकांना आमटी भाकरीच्या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

Post a Comment

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget