पागोरी पिपंळगावात ग्रामदैवत गैबीबाबा (गहीनीनाथ) याञा उत्सव

 धार्मिक,सांस्कृतिक,मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन

पाथर्डी- प्रतिनिधी | अमोल म्हस्के
पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिपंळगाव येथील ग्रामदैवत गैबीबाबा(गहीनीनाथ) याञेला उत्साहात सुरवात झाली आहे.परीसरातील प्रसिद्ध देवस्थान असून दिपावली सणानंतर येणाऱ्या पौर्णिमेनंतर पहील्या गुरुवारी याञेला सुरवात होते.याञेचा कालावधी चार दिवसाचा असतो.गावामध्ये यावेळी अनेक धार्मिक,सांस्कृतिक   तसेच मनोरंजनात्मक कार्यक्रम होतात.त्यामध्ये पारंपरिक संदल व राञी देवाचा छबिना तसेच शनिवारी गैबीबाबा मंदिराजवळ कुस्त्यांचा हगामा होतो.जिल्ह्यातील कुस्तीपट्टू याठिकाणी कुस्ती खेळण्यासाठी येतात.
यामध्ये परीसरातील भाविक भक्त व गावकरी मंडळी तसेच तालुक्यातील,जिल्ह्यातील पाहुणे मंडळी याञेत मोठ्या उत्साहात आंनदाने सहभागी होता.गावातील गहीनीनाथ देवस्थान तालुक्यातील  प्रसिद्ध देवस्थान असून या ठिकाणी दरवर्षी याञा भरते.गावात प्रत्येकाच्या घरी गोड जेवणाचा कार्यक्रम असतो.यावेळी याञेत लहान मुलांच्या खेळण्याचे साहित्य,घरउपयोगी शोभेच्या वस्तू,मिठाईचे दुकानदार परीसरातून येवून याञेची शोभा वाढवतात.परीसरातील वातावरण  आनंदमय होते.


Post a Comment

[blogger]

MKRdezign

संपर्क फॉर्म

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget